sandeep Shirguppe
राष्ट्रीय लसूण दिवस दरवर्षी १९ एप्रिल रोजी साजरा केला जातो. हा दिवशी लसूण खाण्याचे महत्व सांगितलं जातं.
अनेक लोक चहाचे शौकीन असतात. थकवा दूर करण्यासाठी किंवा डोकेदुखीच्या वेळी अनेकांना चहा प्यायला आवडते.
अशा स्थितीत लसणाचा चहा घेणे हेल्दी आणि चविष्ट उपाय ठरू शकते. हा चहा बनवायला सोपा आहे.
लसून रक्तदाब आणि कोलेस्टेरॉलची पातळी कमी करण्यास मदत करते यामुळे हृदयविकाराचा धोका कमी होतो.
रक्ताच्या गुठळ्या तयार होण्यास लसून प्रतिबंधित करते, ज्यामुळे हृदय अपयश आणि स्ट्रोकचा धोका कमी होतो.
2-3 लसूण पाकळ्या, ठेचून १ कप पाणी १/२ टीस्पून आल्याचा रस 1/4 टीस्पून मध, लिंबाचा रस (चवीनुसार)
एका भांड्यात पाणी उकळून घ्या. उकळत्या पाण्यात लसूण पाकळ्या घाला आणि 5 मिनिटे उकळवा.
गॅस बंद करून त्यात आल्याचा रस आणि मध टाका. चहा गाळून घ्या आणि त्यात लिंबाचा रस घालून मिक्स करा. हा चहा कोमट असतानाच प्या.