Goat Farming : उन्हाळ्यात शेळ्यांना कसा आहार द्याल?

Team Agrowon

उन्हाळ्यात शेळ्यांना त्यांच्या शरीराचे तापमान योग्य त्या प्रमाणात ठेवण्यास अडचणी निर्माण होतात. त्याचा परिणाम शेळ्यांचे दूध उत्पादन, वाढ आणि आरोग्यावर होताना आपणास दिसतो.

Goat Farming | Agrowon

शेळ्यांना दिवसभरात लागणारा चारा एकावेळी देण्याऐवजी समान विभागणी करून तीन ते चार वेळेस द्यावा.

Goat Farming | Agrowon

चाऱ्याची कुट्टी करून हिरवा व वाळलेला चारा यांचे मिश्रण करून द्यावा. वाळलेल्या गवतावर किंवा कडब्यावर मिठाचे किंवा गुळाचे पाणी शिंपडावे जेणेकरून शेळ्या आवडीने चारा खातात.

शेळ्यांना जास्त चावावा लागणारा चारा हा सकाळ किंवा सायंकाळी द्यावा. जेणेकरून शरीरात अतिरिक्त उष्णता तयार होणार नाही. या कालावधीत शेळ्यांना अतिरिक्त ऊर्जा पुरविणे गरजेचे आहे. ताण सहन करण्यासाठी शरीरातील बिघडलेल्या क्षारांचा समतोल साधण्यासाठी योग्य प्रमाणात खनिज मिश्रण देणे गरजेचे आहे.

उन्हाळ्यात शरीरातील पाण्याचे संतुलन ठेवण्यासाठी सोडियम, पोटॅशिअमचे प्रमाण चांगल्या पातळीवर ठेवणे गरजेचे असते. कारण वाढलेल्या तापमान काळात पोटॅशियम जास्त प्रमाणात बाहेर टाकले जाते. यासाठी यांचा खाद्यातून पुरवठा करावा.

उन्हाळ्यात शारीरिक तापमान समतोल साधण्यासाठी अॅन्टिऑक्सिडंट्‍स जसे जीवनसत्त्व क आणि ई चा आहारात समावेश करावा.

उन्हाळ्यात शेळ्यांची भूक कमी होते, अशावेळी कमीत कमी खाद्यामध्ये जास्तीत जास्त पोषक घटक देऊन उत्पादन घेता येते. त्यासाठी बायपास फॅटचा वापर करावा. शेळीच्या पोटात बायपास फॅटवर कुठलीच प्रक्रिया होत नसल्याने कोठी पोटाचे तापमान कमी राखण्यास मदत होते.

Goat Farming | Agrowon

चाऱ्याची कुट्टी करून हिरवा व वाळलेला चारा यांचे मिश्रण करून द्यावा.

Goat Farming | Agrowon

वाळलेल्या गवतावर किंवा कडब्यावर मिठाचे किंवा गुळाचे पाणी शिंपडावे जेणेकरून शेळ्या आवडीने चारा खातात.

Goat Farming | Agrowon

शेळ्यांना जास्त चावावा लागणारा चारा हा सकाळ किंवा सायंकाळी द्यावा. जेणेकरून शरीरात अतिरिक्त उष्णता तयार होणार नाही.

Goat Farming | Agrowon

उन्हाळ्यात शारीरिक तापमान समतोल साधण्यासाठी अॅन्टिऑक्सिडंट्‍स जसे जीवनसत्त्व क आणि ई चा आहारात समावेश करावा.

Goat Farming | Agrowon