Roshan Talape
पावसाळ्यात ओलसर हवेमुळे कपड्यांना वास येतो, पण योग्य उपायांनी टाळता येतो पाहूयात त्याबद्दलची माहिती.
कपड्यांचे आतले बाजू बाहेर करून वाळवले तर वास कमी होतो आणि लवकर सुकतात.
कपडे धुताना शेवटी थोडं व्हिनेगर टाकल्यास वास दूर राहतो आणि कपडे मऊ राहतात.
खिडकीजवळ, फॅनखाली किंवा एक्झॉस्ट फॅनच्या जवळ कपडे वाळवा.
धुताना थोडा बेकिंग सोडा टाकल्यास वास कमी होतो आणि ताजेतवाने वाटते.
कपडे एकावर एक न ठेवता थोड्या अंतरावर टांगल्यास हवा खेळती राहते आणि वास येत नाही.
सुगंधीत फॅब्रिक सॉफ्टनर कपड्यांना चांगला वास देतो आणि ओलसरपणाही कमी करतो.
अत्यावश्यक असल्यास हलक्या तापमानावर इस्त्री करून कपडे वासमुक्त करता येतात.