Maharashtra Forts: UNESCO यादीत समाविष्ट छत्रपती शिवरायांचे किल्ले; पाहा फक्त एका क्लिकवर!

Roshan Talape

युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीतील किल्ले

छत्रपती शिवाजी महाराजांच्या ऐतिहासिक किल्ल्यांना युनेस्कोच्या जागतिक वारसास्थळ यादीत मान्यता मिळाली आहे. या गौरवशाली दुर्गांची ओळख करून घेऊया.

UNESCO | Agrowon

रायगड किल्ला

रायगड किल्ला हा छत्रपती शिवाजी महाराजांचा राजधानी किल्ला होता. १६७४ साली याच किल्ल्यावर महाराजांचे राज्याभिषेक सोहळा पार पडला होता.

Raigad Fort | Agrowon

शिवनेरी किल्ला

हा पुणे जिल्ह्यात जुन्नरजवळ असलेला ऐतिहासिक दुर्ग आहे. याच किल्ल्यावर १९ फेब्रुवारी १६३० रोजी छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला.

Shivneri Fort | Agrowon

प्रतापगड किल्ला

महाराष्ट्राच्या सातारा जिल्ह्यात, महाबळेश्वरपासून सुमारे २५ किमी अंतरावर सह्याद्रीच्या रांगेत वसलेला ऐतिहासिक किल्ला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी १६५६ साली हा किल्ला बांधला.

Pratapgadh Fort | Agrowon

लोहगड किल्ला

लोहगड किल्ला हा पुणे जिल्ह्यात मळवली गावाजवळ सह्याद्रीच्या डोंगररांगेत वसलेला एक प्राचीन आणि भक्कम किल्ला आहे.

Lohgad Fort | Agrowon

राजगड किल्ला

पुणे जिल्ह्यात वेल्हे तालुक्यात असलेला एक भव्य आणि ऐतिहासिक किल्ला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची ही पहिली राजधानी होती आणि सुमारे २५ वर्षे त्यांनी येथे राज्यकारभार केला.

Rajgad Fort | Agrowon

खान्देरी किल्ला

अरबी समुद्रात अलिबागजवळ वसलेला एक जलदुर्ग आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी १६७९ मध्ये या किल्ल्याची उभारणी केली. हा किल्ला धोरणात्मकदृष्ट्या ब्रिटिश आणि पोर्तुगीज सागरी मार्गांवर नियंत्रण ठेवण्यासाठी वापरला गेला.

Khanderi Killa | Agrowon

सुवर्णदुर्ग किल्ला

सुवर्णदुर्ग किल्ला हा अरबी समुद्रात, दापोली तालुक्यातील हरिहरेश्वर आणि बुरोंडी किनाऱ्याजवळ स्थित एक भक्कम सागरी किल्ला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी या किल्ल्याचे बांधकाम १६६०च्या सुमारास सागरी संरक्षणासाठी केले होते.

Suvarndurg Fort | Agrowon

Alum Benefits: तुरटीची कमाल! आरोग्य, स्वच्छता आणि सौंदर्याचं एकाचवेळी समाधान

अधिक माहितीसाठी....