Anuradha Vipat
जाणून घेऊयात दिवाळीच्या सणात लहान मुलांना स्टायलिश लुक देण्यासाठी लहान मुलांचे दिवाळी फेस्टिव्ह वेअर कलेक्शन्स आणि महत्त्वाच्या टिप्स.
हा लहान मुलांसाठी सर्वात लोकप्रिय आणि रॉयल प्रकार आहे. प्लेन कुर्त्यावर फ्लोरल किंवा एम्ब्रॉयडरी केलेले मोदी जॅकेट घातल्यास मुले खूप गोड दिसतात.
दिवाळीच्या पूजेसाठी पारंपारिक लुक हवा असल्यास रेडीमेड धोती आणि सिल्कचा कुर्ता सर्वोत्तम पर्याय आहे.
जर तुम्हाला थोडा मॉडर्न आणि क्लासी लुक हवा असेल, तर सिल्क फॅब्रिकमधील शॉर्ट जोधपुरी कोट आणि पँटचा सेट निवडू शकता.
मुलींसाठी दिवाळीत लेहेंग्यापेक्षा सुंदर काहीच असू शकत नाही. बांधणी, पटोला सिल्क किंवा हलक्या ऑर्गेन्झा फॅब्रिकमधील फ्लोरल लेहेंगा मुलींना खूप आवडतो.
भरपूर घेर असलेला फ्लोअर-लेंथ अनारकली ड्रेस मुलींना परीसारखा लुक देतो. हा घालण्यास आणि वावरण्यास खूप सोपा असतो.
हा एक इंडो-वेस्टर्न आणि ट्रेंडी पर्याय आहे. शॉर्ट पेपलम कुर्त्यावर शरारा पॅंट किंवा धोती घातल्याने मुलींना कम्फर्टेबल आणि मॉडर्न लुक मिळतो.