Anuradha Vipat
दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये कुटुंबासोबत आनंददायी वेळ घालवण्यासाठी , निसर्गाचा किंवा संस्कृतीचा आनंद घेण्यासाठी सर्वोत्तम ठिकाणे खालीलप्रमाणे आहेत.
तुमच्या कुटुंबाच्या आवडीनुसार हिल स्टेशन, बीच किंवा ऐतिहासिक ठिकाण तुम्ही यातील योग्य पर्याय निवडू शकता.
जर तुम्हाला जास्त लांब जायचे नसेल, तर महाराष्ट्रातील हे थंड हवेचे ठिकाण दिवाळीसाठी सर्वोत्तम आहे. ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये येथील हवामान अतिशय आल्हाददायक आणि सुखद असते.
दिवाळीमध्ये गोव्यात 'नरकासूर वध' मोठ्या उत्साहात साजरा केला जातो, जो पाहण्यासारखा असतो.
'पिंक सिटी' म्हणून प्रसिद्ध असलेले जयपूर दिवाळीच्या सजावटीसाठी संपूर्ण भारतात ओळखले जाते. येथील बाजारपेठा आणि किल्ल्यांवर केलेली रोषणाई पाहण्यासाठी देशभरातून पर्यटक येतात.
जर तुमच्या कुटुंबाला अध्यात्मिक आणि सांस्कृतिक वारसा अनुभवायचा असेल, तर वाराणसी (काशी) पेक्षा उत्तम जागा नाही.
गर्दीपासून दूर, सह्याद्रीच्या कुशीत शांतता हवी असल्यास नगर जिल्ह्यातील भंडारादरा हिल स्टेशन उत्तम ठिकाण आहे. नोव्हेंबर महिन्यात येथील निसर्ग पूर्ण हिरवाईने नटलेला असतो