Anuradha Vipat
कॉटन साडी दिसायला अत्यंत सुंदर आणि भारदस्त दिसते, पण नेसल्यानंतर ती फुगते आणि त्यामुळे शरीर जाड दिसू लागते.
योग्य पद्धतीने काळजी घेतली आणि काही सोप्या ट्रिक्स वापरल्या, तर कॉटन साडी अजिबात न फुगता अंगासरशी छान बसेल.
साडी पहिल्यांदा नेसण्यापूर्वी ती साध्या पाण्यात अर्धा तास भिजवून ठेवा, यामुळे कडक कलफ निघून जाईल आणि साडी मऊ होईल.
साडी नेसण्यापूर्वी त्याला व्यवस्थित स्टीम इस्त्री करा. इस्त्री करतानाच साडीचा पदर आणि समोरील निऱ्या आधीच बनवून त्यावर इस्त्री फिरवून घ्या.
कॉटन साडीखाली खूप जास्त घेर असलेला पेटीकोट घालणे टाळा. त्याऐवजी फिश-कटपेटीकोट किंवा साडी शेपवेअर वापरा.
कॉटन साडीच्या निऱ्या नेहमी थोड्या रुंद पाडाव्यात. बारीक निऱ्या केल्यास साडी एकावर एक येऊन समोरून जास्त फुगलेली दिसते.
डाव्या बाजूने कापड कंबरेपाशी आणताना ते घट्ट ओढून घ्या आणि तिथे एक छोटी सुई किंवा सेफ्टी पिन लावा. यामुळे साडी कंबरेला घट्ट बसेल.