Anuradha Vipat
पार्लरमध्ये हजारो रुपये खर्च न करता तुम्ही अतिशय सोप्या पद्धतीने घरच्या घरी पेडीक्योर आणि मॅनीक्योर करू शकता.
नेलपॉलिश , कोमट पाणी, टब किंवा घमेले, लिंबू, खाण्याचा सोडा किंवा शॅम्पू, नेल कटर, फायलर, प्युमिस स्टोन, स्क्रबर आणि मॉइश्चरायझर.
कापसाच्या मदतीने नखांवर लावलेली जुनी नेलपॉलिश पूर्णपणे काढून टाका. हाताची आणि पायाची नखे योग्य आकारात कापा आणि फायलरने ती घासून गुळगुळीत करा.
एका मोठ्या टबमध्ये कोमट पाणी घ्या. या पाण्यात १ चमचा शॅम्पू, १ चमचा खाण्याचा सोडा आणि एका लिंबाचा रस टाका. या कोमट पाण्यात तुमचे हात आणि पाय १० ते १५ मिनिटे भिजवून ठेवा.
लिंबाचा तुकडा नखांवर घासून स्वच्छ करा. पायाच्या टाचांवरील घट्टे आणि मृत त्वचा काढण्यासाठी प्युमिस स्टोनचा वापर करा.
साखर, कॉफी आणिखोबरेल तेल एकत्र करून स्क्रब तयार करा. या दोन्ही हातांना आणि पायांना ५ मिनिटे गोलाकार मसाज करा .
कोणतीही चांगली मॉइश्चरायझिंग क्रीम, लोशन किंवा कोरफडीचे जेल लावून ५ मिनिटे छान मसाज करा.