Homemade Hair Spa : घरच्या घरी हेअर स्पा कसा करावा? सोपी पद्धत

Anuradha Vipat

हेअर स्पा

पार्लरमध्ये जाऊन हजारो रुपये खर्च करण्याऐवजी तुम्ही अगदी सोप्या पद्धतीने घरच्या घरी हेअर स्पा करू शकता.

Homemade Hair Spa | Agrowon

फायदेशीर

प्रदूषण, कडक ऊन आणि रासायनिक प्रक्रियांमुळे खराब झालेले केस मऊ, चमकदार आणि मजबूत करण्यासाठी हेअर स्पा अत्यंत फायदेशीर ठरतो.

Homemade Hair Spa | agrowon

कोमट तेलाने मसाज

एका लहान वाटीत २ ते ३ चमचे नारळाचे तेल, बदाम तेल किंवा ऑलिव्ह ऑईल कोमट करून घ्या. या तेलाने केसांच्या मुळांशी आणि संपूर्ण केसांना १० ते १५ मिनिटे हलक्या हाताने मसाज करा.

Homemade Hair Spa | agrowon

केसांना वाफ देणे

एक स्वच्छ टॉवेल कोमट पाण्यात भिजवून पिळून घ्या. हा गरम टॉवेल तुमच्या डोक्याभोवती १० ते १५ मिनिटांसाठी गुंडाळून ठेवा.

Homemade Hair Spa | Agrowon

सौम्य शाम्पूने केस धुणे

वाफ देऊन झाल्यानंतर केस सौम्य किंवा सल्फेट-मुक्त शाम्पूने धुवून घ्या.

Homemade Hair Spa | agrowon

हेअर मास्क

हेअर स्पा मधील ही सर्वात महत्त्वाची स्टेप आहे. एका वाटीत १ पिकलेले केळे मॅश करा, त्यात २ चमचे दही आणि १ चमचा मध एकत्र करून पेस्ट बनवा. हा मास्क मुळांपासून केसांच्या टोकापर्यंत व्यवस्थित लावा .

Homemade Hair Spa | Agrowon

कंडिशनिंग किंवा सीरम

केस थोडे सुकल्यानंतर किंवा ओले असतानाच केसांच्या लांबीवर थोडे हेअर सीरम किंवा लीव-इन कंडिशनर लावा.

Homemade Hair Spa | Agrowon

Healthy Morning Drinks : दिवसाची सुरुवात चहाऐवजी 'या' ५ हेल्दी ड्रिंक्सने करा

Healthy Morning Drink | Agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...