Anuradha Vipat
व्यवसायात चांगला नफा मिळेल. उत्साह आणि उमेद वाढेल. वाहन चालवताना काळजी घ्या.
सामाजिक प्रतिष्ठा वाढेल. कामाचे कौतुक होईल आणि वैवाहिक जीवनात आनंद राहील.
हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल. पैसे कमावण्यासाठी दिवस चांगला आहे.
दुपारनंतर परदेशातून किंवा दूरवरून शुभ बातम्या मिळतील. बोलण्यावर संयम ठेवा.
आरोग्याच्या बाबतीत निरोगी राहाल. एखादी महत्त्वाची चांगली वार्ता समजेल.
कामाच्या यशामुळे मनाला आनंद मिळेल, प्रवास किंवा पर्यटनाचे योग आहेत.
जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल. भागीदारीच्या कामात लाभ मिळण्याचे योग आहेत.
नोकरीत परिस्थिती समाधानकारक राहील. विरोधकांवर विजय मिळवाल. कामाचा ताण वाढू शकतो.
संततीचे प्रश्न मार्गी लागतील. आर्थिक क्षेत्रात धाडसी निर्णय घेण्यास हरकत नाही.
प्रॉपर्टी किंवा स्थावर मालमत्तेचे सौख्य लाभेल. नवीन संधी आणि धनलाभाचे योग आहेत.
जिद्द आणि चिकाटी वाढेल. एखादी मोठी आणि महत्त्वाची जबाबदारी अंगावर पडेल.
अचानक धनलाभाची शक्यता असून जुनी रखडलेली येणी वसूल होतील.