Team Agrowon
शेतात पसरलेल्या पाचटावर एकरी ५० किलो युरिया, ५० किलो सिंगल सुपर फॉस्फेट टाकावे. याशिवाय १ किलो पाचट कुजविणारे जिवाणू २०० लिटर पाण्यात मिसळून पाचटावर फवारावे.
खोडवा उसाला चांगला फुटवा येण्यासाठी लागण उसाची तोड जमिनीलगत करावी.
पाचट आच्छादन केल्यानंतर सर्व बुडखे जमिनीलगत तासून घ्यावेत. बुडख्यावर १०० मिलि कार्बेन्डाझिम १०० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
उसाच्या पाचटात ३९ ते ४६ टक्के सेंद्रिय कर्ब, ०.३३ ते ०.४४ टक्के नत्र, ०.२ टक्के स्फुरद आणि ०.६ टक्के पालाश असते. त्यामुळे पाचट न जाळता ते शेतातच पसरुन कुजवलेलं कधीची चांगल.
खोडवा पिकात दीड फुटांपेक्षा जास्त अंतरावर तुट पडली असेल तर ही तुटाळ भरून घेण्यासाठी त्याठिकाणी प्लॅस्टिक पिशवीमधील किंवा ट्रेमधील ३० ते ३५ दिवसाची उसाची रोपे लावावीत.
खोडवा पिकात कोणत्याही प्रकारची आंतरमशागत करण्याची म्हणजेच जारव्हा तोडणे, बगला फोडण्याची गरज लागत नाही.
पाचट आच्छादनामुळे तणांचा प्रादुर्भाव फारच कमी होतो. त्यामुळे पाचट न जाळता त्याचं उसात आच्छादन कराव.