Anuradha Vipat
ऑफिसमधील राजकारणापासून दूर राहण्यासाठी केवळ तुमच्या कामावर लक्ष केंद्रित करणे आणि सहकाऱ्यांशी व्यावसायिक अंतर राखणे हा सर्वात प्रभावी उपाय आहे.
तुमचे काम इतके चोख ठेवा की कोणालाही त्यावर बोट ठेवण्याची संधी मिळणार नाही.
तुम्ही केलेल्या कामाची, मिळालेल्या कौतुकाची आणि ईमेल संवादाची लेखी नोंद नेहमी स्वतःकडे सुरक्षित ठेवा.
कॅन्टीनमध्ये किंवा लंच ब्रेक दरम्यान जेव्हा इतर कर्मचाऱ्यांबद्दल किंवा बॉस बद्दल वाईट बोलले जात असेल, तेव्हा तिथून हळूच बाजूला व्हा.
कोणत्याही वादात किंवा कोणाचीही बाजू घेण्यामध्ये रस दाखवू नका. तुमचे मत नेहमी तटस्थ ठेवा.
ऑफिसमधील सहकाऱ्यांशी तुमच्या वैयक्तिक आयुष्यातील गोपनीय गोष्टी किंवा घरगुती समस्या शेअर करणे टाळा.
सर्वांशी हसून-खेळून वागा, पण कोणाच्याही इतके जवळ जाऊ नका की त्यांच्या राजकीय गटाचा तुम्ही भाग वाटाल.