Cowpea Fodder: उन्हाळ्यात हिरव्या चाऱ्यासाठी चवळीची लागवड ठरेल फायदेशीर!

Swarali Pawar

उन्हाळ्यात चाऱ्याचा उपाय!

उन्हाळा आला की हिरवा चारा कमी पडतो. अशा वेळी चवळीची लागवड शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरते.

Fodder in Summer | Agrowon

चवळी का महत्त्वाची?

चवळीमध्ये १३ ते १५ टक्के प्रथिने असतात. म्हणून जनावरांसाठी ती पौष्टिक आणि रुचकर चारा आहे.

Why Cowpea is Important | Agrowon

जमिनीलाही फायदा!

चवळी हे द्विदल पीक असल्यामुळे नत्र स्थिरीकरण करते. यामुळे जमिनीची सुपीकता आणि पोत सुधारतो.

Helpful for Soil | Agrowon

लागवडीची योग्य वेळ

हिरव्या चाऱ्यासाठी फेब्रुवारी ते एप्रिल हा उत्तम काळ. मध्यम ते भारी, चांगला निचरा होणारी जमीन योग्य ठरते.

Sowing Time | Agrowon

बियाणे आणि पेरणी

हेक्टरी ३०–४० किलो बियाणे लागते. बी २–३ सें.मी. खोल पेरा आणि ओळीतील अंतर २५–३० सें.मी. ठेवा.

Seed and Sowing | Agrowon

शिफारस केलेले वाण

श्वेता, ईसी ४२१६, बुंदेल लोबिया आणि युपीसी ५२८६ वाण योग्य. श्वेता वाणाला भरपूर हिरवी आणि रुंद पाने येतात.

Recommended Variety | Agrowon

खत आणि पाणी व्यवस्थापन

पेरणीवेळी शेणखत आणि स्फुरद द्यावे. दर ७ ते ९ दिवसांनी पाणी देऊन एकूण ६ ते ७ पाळ्या द्याव्यात.

Fertilizer and Water Management | Agrowon

काढणी

६०–६५ दिवसांनी, ५०% फुलोरा आल्यावर काढणी करा. योग्य वेळी काढणी केल्यास हेक्टरी २५–४० टन हिरवा चारा मिळतो.

Fodder Harvesting | Agrowon

Rainport Sprinkler: उन्हाळ्यातील पाणीटंचाईवर उपाय; रेनपोर्ट स्प्रिंकलर ठरते स्मार्ट पर्याय

Agrowon
अधिक माहितीसाठी...