Rainport Sprinkler: उन्हाळ्यातील पाणीटंचाईवर उपाय; रेनपोर्ट स्प्रिंकलर ठरते स्मार्ट पर्याय

Swarali Pawar

उन्हाळ्यातील उपाय!

पाणी कमी आणि गरज जास्त, शेतकऱ्यांसाठी मोठं आव्हान. रेनपोर्ट स्प्रिंकलर ठरू शकतो कमी पाण्यात जास्त उत्पादनाचा पर्याय.

Solution in Summer | Agrowon

रेनपोर्ट म्हणजे काय?

रेनपोर्ट हा तुषार सिंचनाचाच एक मिनी स्प्रिंकलर प्रकार आहे. तो ठिबकसारख्या कमी दाबावर चालतो आणि पावसासारखे पाणी देतो.

What is Rainport Sprinkler | Agrowon

कसा काम करतो?

पाणी सूक्ष्म तुषारांमध्ये पिकावर पडते. म्हणून संपूर्ण शेतात समान प्रमाणात पाणी पोहोचते.

How it Works | Agrowon

कसं उभारायचं?

स्प्रिंकलर साधारण १० x १० मीटर अंतरावर बसवतात. हलके पॉलिथिलीन पाईप असल्याने ने-आण करणे सोपे जाते.

Sprinkler Irrigation Spacing | Agrowon

कोणत्या पिकांसाठी?

गहू, हरभरा, कांदा, लसूण, बटाटा यांसाठी फायदेशीर. सपाट वाफे किंवा सरी-वरंबा पद्धतीतही वापरता येतो.

For Which Crops | Agrowon

पाणी बचत

रेनपोर्टमुळे ४०–४५% पाणी बचत होते. पाणी वापर कार्यक्षमता ८०–८५% पर्यंत मिळते.

Water Saving | Agrowon

अजून फायदे?

जमीन वाफसा ठेवता येते आणि खतांची कार्यक्षमता वाढते. लहान तुषारांमुळे पिकांचे नुकसान टाळता येते.

Other Benefits | Agrowon

खतही देता येते!

रेनपोर्टद्वारे विद्राव्य खते देता येतात, पण दाब स्थिर ठेवणे गरजेचे. फर्टिगेशननंतर १०–१५ मिनिटे स्वच्छ पाणी चालवायला विसरू नका.

Fertigation | Agrowon

World Pistachino's Day: आज जागतिक पिस्ता दिन, पिस्ताच्या माहिती नसलेल्या ६ गोष्टी!

Agrowon
अधिक माहितीसाठी...