Swarali Pawar
बांबूचा उत्पादन खर्च कमी असतो आणि एकदा लावल्यानंतर ४० वर्षे उत्पादन मिळते. हा पर्याय शेतकऱ्यांसाठी सतत उत्पन्न देणारा ठरतो.
बांबू जमिनीची धूप थांबवतो आणि पोत सुधारतो. तो पर्यावरणासाठी उपयुक्त आणि शाश्वत आहे.
उष्ण आणि दमट हवामान बांबूस अनुकूल असते. जास्त पावसाचे आणि निचऱ्याची क्षमता असलेली जमीन योग्य ठरते.
बांबूची लागवड बियाणे किंवा कंद यांद्वारे होते. ५ बाय ५ मीटर अंतरावर लागवड केल्यास हेक्टरला ४०० रोपे लावता येतात.
एप्रिल-मे मध्ये खड्डे करून त्यात शेणखत व खत टाकावे. पावसाळ्यात रोपे लावल्यास चांगली वाढ होते.
पहिल्या दोन वर्षे नियमित पाणी व तण काढणे आवश्यक. मुग, उडीद, सोयाबीनसारखी आंतरपिके घेऊन अतिरिक्त उत्पन्न मिळते.
बांबू लागवडीनंतर ४-५ वर्षांनी काढणी करता येते. नोव्हेंबर ते फेब्रुवारीमध्ये छाटणी व काढणी केल्यास योग्य उत्पादन मिळते.
पाचव्या वर्षी २००० बांबू मिळू शकतात – १ लाखांपर्यंत उत्पन्न! दरवर्षी उत्पादन १०-१५% वाढते. ही शेती खऱ्या अर्थाने शाश्वत ठरते.