Rice Pest Control: भात पिकावरील निळे भुंगेरे आणि खोडकिडीचे नियंत्रण कसे करावे?

Swarali Pawar

निळे भुंगेरे- लक्षणे

ही कीड पानातील हरितद्रव्य खाते. पानावर पांढरे पट्टे दिसतात आणि पाने करपल्यासारखी होतात.

Symptoms of Blue Beetles | Agrowon

निळे भुंगेरे- कारणे

पाणथळ जमीन व निचरा नसल्यास या किडीचा प्रादुर्भाव वाढतो.
जास्त नत्र खत दिल्यासही ही कीड जास्त दिसते.

Cause of Blue Beetle | Agrowon

निळे भुंगेरे- पारंपरिक उपाय

शेतात ५ सें.मी. पाणी ठेवावे व जास्त पाणी लगेच काढावे. खाचरातील तण काढून टाकावेत व पाणी खेळते ठेवावे.

Traditional Methods | Agrowon

निळे भुंगेरे – रासायनिक नियंत्रण

क्विनॉलफॉस, लॅम्बडा सायहॅलोथ्रीन किंवा कारटॉप हायड्रोक्लोराईड यांची शिफारसीनुसार फवारणी करावी. फवारणीसाठी हवामान उघडे असणे आवश्यक आहे.

Chemical Control | Agrowon

खोडकीड- लक्षणे

अळी खोडात शिरून आतील भाग खाते. यामुळे पोंगा सुकतो आणि "गाभा मर" होतो.

Symptoms of Stem Borer | Agrowon

खोडकीड- प्रतिबंधक उपाय

उन्हाळ्यात खोल नांगरणी करावी जेणेकरून अळ्या मरतील. शेतात गंधसापळे लावावेत व नेपीयार गवताचा सापळा पिकासाठी उपयोग करावा.

Preventive Measures | Agrowon

खोडकीड- रासायनिक नियंत्रण

शेतात ५% किडग्रस्त फुटवे आढळल्यास फवारणी करावी. क्विनॉलफॉस, कारटॉप हायड्रोक्लोराईड किंवा लॅम्बडा सायहॅलोथ्रीन यांचा वापर करावा.

Chemical Control | Agrowon

शेतकऱ्यांसाठी सल्ला

योग्य वेळी उपाययोजना केल्यास भात पिकाचे नुकसान टाळता येते. शेतकरी बांध नीट राखून व फवारणी करून चांगले उत्पादन घेऊ शकतात.

Farmer Advice | Agrowon

Murghas Making: जनावरांसाठी पोषक असलेला मुरघास कसा तयार करावा?

Murghas making | Agrowon
अधिक माहितीसाठी..