Sorghum Farming : ज्वारी लागवड कशी करावी?

Anuradha Vipat

जमिनीची निवड 

मध्यम ते भारी जमीन ज्वारीसाठी चांगली असते. पाण्याचा निचरा चांगला होणारी जमीन निवडावी.

Sorghum Farming | Agrowon

वाणाची निवड

सुधारित वाणांची निवड करावी. उदा. फुले एस.एस.एफ. 733, एस.एस.एफ. 658.

Sorghum Farming | agrowon

पेरणीची वेळ

उन्हाळी ज्वारीसाठी, जानेवारीच्या १० ते १५ दरम्यान पेरणी करावी. खरीप ज्वारीसाठी, जून-जुलैमध्ये पेरणी करावी

Sorghum Farming | agrowon

बियाणे आणि पेरणी

प्रती हेक्टरी ७.५ ते १० किलो बियाणे वापरा. ४५ सेमी (१.५ फूट) अंतरावर ओळी ठेवा. बियाणे १/२ इंच (1.25 cm) खोलीवर पेरा

Sorghum Farming | agrowon

बीजप्रक्रिया:

पेरणीपूर्वी बियाण्यांना3-५ ग्रॅम थायरम किंवा कॅप्टन प्रति किलो बियाणे याप्रमाणे प्रक्रिया करा.

Sorghum Farming | agrowon

खत व्यवस्थापन

पेरणीच्या वेळी, रासायनिक खतांचा वापर करा. पहिल्या पाण्याच्या वेळेस नत्राचा वापर करा.

Sorghum Farming | agrowon

पाणी व्यवस्थापन

ज्वारीला आवश्यकतेनुसार पाणी द्या. पहिल्या पाण्याच्या वेळेस आणि फुलोऱ्याच्या अवस्थेत पाण्याची विशेष गरज असते.

Sorghum Farming | agrowon

Office Wellness Tips : ऑफिसच्या ठिकाणी निरोगी आणि उत्साही राहण्यासाठी काय करावे?

येथे क्लिक करा