Fenugreek Crop : वर्षभर मागणी असणाऱ्या मेथीची लागवड कशी कराल?

Team Agrowon

मेथी ही भाजी अनेकांच्या आवडीची असते. त्यामुळे दैनंदिन आहारात मेथीचा वापर होतो. या कारणामुळे मेथीला वर्षभर चांगली मागणी असते.

Fenugreek Crop | Agrowon

मेथी हे कमी कालावधीचे भाजीपाला पीक असून कमी खर्चात जास्त उत्पादन देणारे पीक आहे.

Fenugreek Crop | Agrowon

भाजीचा सतत पुरवठा होत राहावा यासाठी मेथीची टप्प्या-टप्याने लागवड करून वर्षभर मेथी पिकाची उपलब्धता करता येऊ शकते.

Fenugreek Crop | Agrowon

आंतरपीक म्हणून मेथी पिकाची लागवड करायची असल्यास मुख्य पिकातील मोकळ्या जागेत असणाऱ्या वीस ते तीन सेंटीमीटर जागेत लागवड करतात.

Fenugreek Crop | Agrowon

मुख्य पीक म्हणून लागवड करायची असल्यास तीन मिटर बाय दोन मीटर च्या सपाट वाफ्यामध्ये लागवड करतात.

Fenugreek Crop | Agrowon

दोन ओळींमध्ये पंधरा ते वीस सेंटीमीटर अंतर ठेवून मेथीचे बी फेकून लागवड करतात.

Fenugreek Crop | Agrowon

मेथीचे मुख्य पीक म्हणून एक हेक्टर लागवडीसाठी पंचवीस ते तीस किलो बियाणे लागते. आंतरपीक घेताना आवश्यकतेनुसार बियाण्यांचे प्रमाण घ्यावे.

Fenugreek Crop | Agrowon
आणखी पाहा...