Team Agrowon
शिंगाडा हे उपवासाच्या काळात विशेष मागणी असलेले पीक आहे. शिंगाड्याची लागवड प्रामुख्याने उष्ण आणि समशीतोष्ण प्रदेशात तलाव, शेततळे, तसेच भातपिकाच्या खाचरांमध्ये केली जाते.
सद्यःस्थितीत ज्या शेतकऱ्यांच्या शेततळ्यात पाणी आहे त्यांना या पिकाची लागवड करता येते. शिंगाड्याच्या फळामध्ये अनेक आयुर्वेदिक गुणधर्म असतात.
फळाची जाडी दोन सेंटिमीटर इतकी असते. फळाचा गर मऊ असतो व चव किंचित गोड असते. शिंगाड्याचे कंद व फळांना उपवासामध्ये विशेष मागणी आहे.
शेतकऱ्यांना चांगले आर्थिक उत्पन्न देणाऱ्या या पिकाची लागवड फायदेशीर ठरू शकते.
सद्यःस्थितीत हिरव्या, लाल किंवा जांभळ्या रंगांचे टरफल असलेल्या स्थानिक जातींची लागवड केली जाते.
कानपुरी, जैनपुरी, देशी छोटे किंवा मोठे असे शिंगाड्याचे काही प्रकार आहेत. पश्चिम बंगाल आणि भारताच्या पूर्व भागात या जातींची लागवड केली जाते.
शिंगाड्याची व्यावसायिक पद्धतीने लागवड बियाण्याद्वारे केली जाते.