sandeep Shirguppe
स्वयंपाकघरामध्ये सर्वसाधरणपणे कोथिंबीर किंवा धने हे नियमीत वापरले जातात. कोथिबींर किंवा धन्याचे आरोग्यासाठी अनेक फायदे आहेत.
आयुर्वेदानुसार धन्याचे पाणी सकाळी उठल्यावर पिल्सास वजन कमी होण्यास तसेच अपचनाचा त्रास कमी होतो. यासह धन्याचे आरोग्यासाठी काय फायदे आहेत.
धन्याचे पाणी तुमची प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी होते यामध्ये अँटिऑक्सिडंट्स शरीरातील फ्री रॅडिकल्स कमी करण्यास मदत करतात.
धन्यात व्हिटॅमिन सी आणि ए सारखे मोठ्या प्रमाणात जीवनसत्व आहेत. त्याच वेळी, केस मजबूत आणि जलद वाढण्यासाठी याचा भरपूर होतो.
सकाळी धन्याचे पाणी प्यायल्याने तुमचे केस गळणे आणि तुटणे कमी होऊ शकते. तुम्ही धन्याचे तेल किंवा हेअर मास्क म्हणूनही लावू शकता.
कोथिंबिरीमध्ये काही पचनक्षमता वाढविणारे गुणधर्म असतात. सकाळी धन्याचे पाणी प्यायल्याने पचनक्रिया सुधारते.
धन्यात भरपूर लोह असते. त्यात अँटी-फंगल आणि अँटीबॅक्टेरियल गुणधर्म देखील असतात. सकाळी धन्याचे पाणी प्यायल्याने त्वचा चमकदार आणि मुलायम राहते.
मधुमेह नियंत्रणात ठेवण्यासाठी तुम्ही धन्याचे पाणी पिऊ शकता. यामुळे तुमची शुगर नियंत्रणात राहण्यास मदत होते.
तुम्हाला जर उष्णतेचा त्रास असेल तर धने आणि ताक मिसळून खाल्ल्यास उष्णतेचा त्रास कमी होतो.