Swarali Pawar
थंडी, दव आणि चिलिंग इन्जुरीमुळे गव्हाची पाने पिवळी पडतात. काही वेळा तणनाशक फवारणीनंतरही असा परिणाम दिसतो.
तणनाशक फवारणीनंतर पीक पिवळे पडल्यास घाबरू नका. गहू ५५ दिवसांचा झाल्यावर योग्य खत फवारणीने पीक सावरते.
१९:१९:१९ खताची २% फवारणी करावी. म्हणजे २० मिली खत १० लिटर पाण्यात मिसळून फवारावे.
थंडी व दवामुळे पानांवर ताण येतो, यालाच चिलिंग इन्जुरी म्हणतात. जास्त पिवळेपणा दिसल्यास नत्राचा दुसरा हप्ता द्यावा.
खुरपणी व कोळपणी केल्याने माती भुसभुशीत राहते. जमिनीत हवा खेळती राहून पिकाची वाढ सुधारते.
शेत वाफशावर असताना १–२ वेळा कोळपणी करावी. यामुळे तण नियंत्रणासोबत ओलावा टिकतो.
पेरणीनंतर ३०–३५ दिवसांनी शिफारस केलेली तणनाशके फवारावीत. फवारणीनंतर १०–१२ दिवस पाणी देऊ नये.
थंडीच्या काळात योग्य खत, तण नियंत्रण आणि आंतरमशागत केल्यास गहू पुन्हा हिरवागार होतो. वेळीच उपाय म्हणजे चांगले उत्पादन.