Team Agrowon
हुमणीच्या जीवनक्रमात भुंगेरे हीच एक अवस्था थोड्या कालावधीसाठी जमिनीबाहेर असते. बाकी सर्व अवस्था जमिनीत असतात. त्यामुळे या अवस्थेत किडीचा बंदोबस्त करण्यावर जास्त लक्ष देणे गरजेचे आहे.
पहिला पाऊस झाल्यावर हुमणीचे भुंगेरे सुर्यास्तानंतर बाभूळ, बोर, लिंब या झाडांवर पाने खाण्यासाठी गोळा होतात. अशा झाडांच्या फांद्या रात्री काठीच्या सहाय्याने हलवून खाली पडलेले भुंगेरे गोळा करावीत. राॅकेल मिश्रीत पाण्यात टाकून मारावेत.
पीक काढणीनंतर लगेचच १५ ते २० सेंमी. खोल नांगरट करावी. नांगरणीवेळी उघड्या पडणाऱ्या अळ्या गोळा करुन राॅकेल मिश्रीत पाण्यात टाकून माराव्यात.
आंतरमशागतीच्या वेळेस अळ्या गोळा करुन लोखंडी हुकच्या सहाय्याने किंवा खुरप्याने माराव्यात.
पिकास पाणी देताना एखाद्या दिवशी पाणी जास्त काळ साचून ठेवल्यास अळ्या गुदमरून मरतील.
हुमणीग्रस्त शेतातील कीडग्रस्त सुकलेली पिकांचे रोपे उपटावीत. मुळांशेजारील अळ्यांचा नाश करावा.
बगळा, चिमणी, मैना, कावळा, घार इ. पक्षी त्यांचा फडशा पाडतात. मांजर, रानडुक्कर, मुंगूस, कुत्रा इ. प्राणी हुमणीच्या अळ्या आवडीने खातात.
मेटारायझियम अॅनिसोप्ली हे बुरशीजन्य कीटकनाशक २० किलो/हेक्टरी या प्रमाणात कुजलेल्या शेणखतातून जमिनीत मिसळून बुंध्यापाशी द्यावी. त्यानंतर पिकास हलके पाणी द्यावे.
प्रकाश सापळ्यांचा वापर करुनही हुमणीचं नियंत्रण करता येतं.
शिफारशीप्रमाणे रासायनिक किडनाशकांचा वापर करुनही हुमणीचं नियंत्रण करता येतं.
Animal Care : गोठ्यातील गोचीड, माशा, उवा, पिसवा पळवून लावण्याचे उपाय