Cotton Fulkide Control: कपाशीवरील फुलकिडे आणि तुडतुड्यांचे नियंत्रण कसे करावे?

Swarali Pawar

समस्या का महत्वाची

हे कीटक पानांच्या खालच्या बाजूने रस शोषतात आणि पानं, फुले व कळ्या कोरडी पडतात. परिणामी झाडाची वाढ खुंटते आणि उत्पादनात लक्षणीय घट होते.

Cotton Pests | Agrowon

तुडतुडे ओळख

तुडतुडे हिरवट रंगाचे असून प्रौढांच्या पंखांवर दोन काळे ठिपके दिसतात. पिल्ल्यांना पंख नसतात व ते पानाच्या खालच्या भागातून तिरक्या रेषेत हालतात.

Cotton Jassids | Agrowon

फुलकिडे ओळख

फुलकिडे पिल्ले फिकट पिवळ्या व लहान आकाराची असतात, प्रौढ पिवळसर व बारीक असतात. ही कीडे पानामागून खरवडून रस शोषतात आणि पेशी पांढुरक्या व नंतर तपकिरी दिसतात.

Cotton Thrips | Agrowon

लक्षणे व आर्थिक पातळी

रस शोषल्यामुळे पानांची कडा पिवळी होऊन नंतर तपकिरी व लालसर होतात, तसेच पाने मुरडतात. आर्थिक जोखमीची पातळी: प्रति पान २–३ तुडतुडे किंवा ~१० फुलकिडे आढल्यानंतर कारवाई आवश्यक.

Economically Threshold Level | Agrowon

पारंपरिक उपाय

आंतर-मशागत करून बाग तणमुक्त ठेवा आणि संतुलित नत्र खत वापरा. जुने अवशेष नष्ट करा आणि बीजप्रक्रिया प्रतिबंधात्मक म्हणून करा.

Cotton thrips and jassids | Agrowon

निरीक्षण व सापळे

प्रति हेक्टरी १०–१२ निळे चिकट सापळे लावावेत. पानांच्या पाठीमागील बाजू नियमित तपासून नुकसानाची पातळी ओळखा आणि वेळेवर निर्णय घ्या.

Blue Sticky Traps | Agrowon

जैविक उपाय

निंबोळी अर्क ५% फवारणी प्रभावी आहे आणि अॅझाडिरॅक्टीन ३०० PPM (५० मि.लि./१० लि. पाणी) वापरा. मित्र किडक (ढालकिडा, क्रायसोपा) संवर्धन करून नैसर्गिक नियंत्रण वाढवा.

Neem Ark | Agrowon

रासायनिक गरज व खबरदारी

गरज पडल्यास इमिडाक्लोप्रिड 17.5% (३–४ मि.लि./१० लि.), फिप्रोनिल 5% SC (२० मि.लि./१० लि.) इत्यादी प्रमाणे वापरा. नोव्हेंबरपूर्वी पायरेथ्रॉईड गट टाळा आणि मधमाश्या सक्रिय असताना फवारणी करू नका.

Chemical Spraying | Agrowon

Hoof Health: खुरांच्या आरोग्यासाठी आहाराचे ९ सुवर्णनियम

Animal Hoofs | Agrowon
अधिक माहितीसाठी...