Pest Management: हळदीवर कंदमाशी आणि कंदकुज रोखण्यासाठी करा हे उपाय!

Swarali Pawar

हळदीत कंदमाशीचा धोका!

हळदीच्या कंदावर कंदमाशीचा प्रादुर्भाव वाढल्यास कंदकुजचा धोका वाढतो. म्हणून कंदमाशी आणि कंदकुजचे एकत्रित व्यवस्थापन करा.

Turmeric Pest and Diseases | Agrowon

कंद उघडे पडू देऊ नका!

उघडे कंद कंदमाशीला अंडी घालण्यासाठी सहज उपलब्ध होतात. वेळोवेळी मातीची भरणी करून कंद झाकून ठेवा आणि तण नियंत्रण करा.

Turmeric Pest and Diseases | Agrowon

कंदमाशीवर नियंत्रण मिळवा

क्विनॉलफॉस २५ टक्के प्रवाही २० मिलि किंवा डायमिथोएट ३० टक्के प्रवाही १५ मिलि प्रति १० लिटर पाणी वापरा. फवारणी १५ दिवसांच्या अंतराने आणि कीटकनाशके आलटून-पालटून वापरा.

Turmeric Pest and Diseases | Agrowon

कंदकुज दिसल्यास आळवणी करा

कंदकुज दिसल्यास शिफारशीनुसार बुरशीनाशकाची आळवणी करता येते. आळवणीच्या वेळी जमिनीत वाफसा असावा आणि वापरापूर्वी उत्पादनाचे अद्ययावत लेबल तपासा.

Turmeric Pest and Diseases | Agrowon

शेतात पाणी साचू देऊ नका!

जास्त पाणी साचल्यास कंदकुज वाढण्याचा धोका असतो. पाणी साचलेले दिसताच त्याचा योग्य निचरा करा.

Turmeric Pest and Diseases | Agrowon

ट्रायकोडर्माचा वापर करा

कंदकुज रोखण्यासाठी एकरी २ ते २.५ किलो ट्रायकोडर्मा शेणखतात मिसळून जमिनीत द्या. यामुळे रोगकारक बुरशीचा प्रादुर्भाव कमी करण्यास मदत होऊ शकते.

Turmeric Pest and Diseases | Agrowon

पुढील हंगामासाठीही काळजी घ्या!

हळद काढणीनंतर शेतातील सडलेले कंद आणि पिकांचे अवशेष नष्ट करा. यामुळे पुढील हंगामातील कंदमाशी आणि कंदकुजचा धोका कमी करण्यास मदत होते.

Turmeric Pest and Diseases | Agrowon

फवारणी करताना ही काळजी घ्या!

कीटकनाशके किंवा बुरशीनाशके लेबलवर शिफारस नसल्यास इतर रसायनांसोबत मिसळू नका. फवारणीपूर्वी पावसाचा अंदाज घ्या आणि हातमोजे, मास्क यांसारखी संरक्षक साधने वापरा.

Turmeric Pest and Diseases | Agrowon

Soybean Root Rot: पाण्याच्या ताणामुळे सोयाबीनला मूळकुज? करा हे ४ सोपे उपाय!

Agrowon
अधिक माहितीसाठी..