Swarali Pawar
शेंगा भरण्याच्या अवस्थेत असलेल्या मूग-उडिद पिकात भुरी रोगाचा प्रादुर्भाव दिसू शकतो. वेळीच रोग ओळखून उपाय केल्यास पानगळ आणि उत्पादनातील नुकसान कमी करता येते.
पानांवर सुरुवातीला लहान आणि अनियमित आकाराचे पांढरे चट्टे दिसतात. हळूहळू हे चट्टे संपूर्ण पानावर पसरू लागतात.
रोग वाढल्यास फांद्या आणि फुलांवर पांढरी बुरशी दिसू लागते. प्रादुर्भाव जास्त झाल्यास पाने आणि फुले गळून पडू शकतात.
भुरीचा प्रादुर्भाव पानांच्या देठासोबत शेंगा आणि खोडावरही होऊ शकतो. यामुळे शेंगांची वाढ कमी होऊन उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता असते.
भुरीची सुरुवातीची लक्षणे दिसताच नियंत्रणाची फवारणी करणे महत्त्वाचे आहे. उशीर केल्यास रोगाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढू शकतो.
वेटेबल सल्फर ८० टक्के डब्ल्यूपी २ ते ३ ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळा. तयार द्रावणाची पिकावर व्यवस्थित फवारणी करा.
कमी पाऊस, पावसाचा खंड आणि दमट हवामानात रोगाकडे विशेष लक्ष द्या. पानांवर पांढरे चट्टे दिसताच संपूर्ण शेताची पाहणी करा.
भुरी रोगाकडे दुर्लक्ष केल्यास पानगळ होऊन शेंगांच्या वाढीवर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे सुरुवातीच्या अवस्थेत योग्य उपाय केल्यास मूग-उडिदचे नुकसान कमी करता येते.