Swarali Pawar
टी-आकाराचे पक्षीथांबे हेक्टरी ५० लावावेत. चिमणी व साळुंखी पक्षी अळ्या खाऊन किड कमी करतात.
घाटेअळीच्या सर्वेक्षणासाठी हेक्टरी ५ कामगंध सापळे लावा. हे सापळे जमिनीपासून सुमारे १ मीटर उंचीवर ठेवा.
पिकाच्या सुरुवातीला निंबोळी अर्क किंवा अझाडिरॅक्टिन फवारणी करा. १५ दिवसांच्या अंतराने फवारणी केल्यास पतंग अंडी घालत नाहीत.
५० टक्के फुलोऱ्यात अळी दिसल्यास हाताने वेचणी करा. वेचलेल्या अळ्या किटकनाशक मिश्रित पाण्यात टाका.
लहान अळ्यांसाठी HNPV विषाणूची फवारणी उपयुक्त ठरते. तसेच बॅसिलस थुरिनजिएन्सीसची फवारणी प्रभावी आहे.
फवारणीत थोडे निळ (राणीपाल) मिसळल्यास परिणाम वाढतो. उन्हापासून विषाणूचे संरक्षण होते आणि नियंत्रण चांगले मिळते.
किड आर्थिक नुकसान पातळी ओलांडल्यासच रासायनिक फवारणी करा. योग्य वेळ व योग्य उपाय केल्यास उत्पादन सुरक्षित राहते.