Swarali Pawar
तेलकट रोग झँथोमोनस या जिवाणूमुळे होतो. दमट हवामान, जास्त पाऊस, झाडांची दाटी आणि अस्वच्छ बाग या रोगाच्या प्रसाराला कारणीभूत ठरतात.
पानांवर तेलकट-काळे डाग, फांद्यांवर व खोडावर डाग पडणे, पाने पिवळी पडून गळणे आणि फळांवर तडे जाणे ही मुख्य लक्षणे आहेत. गंभीर प्रादुर्भावात फळे सडून गळून पडतात.
रोगमुक्त रोपांची लागवड करावी, बागेत स्वच्छता ठेवावी, रोगग्रस्त अवशेष नष्ट करावेत आणि ठिबक सिंचनाचा अवलंब करावा. कासुगामायसिन + कॉपर ऑक्सीक्लोराईड किंवा बोर्डो मिश्रणाची फवारणी उपयुक्त ठरते.
कुजवा रोग अल्टरनेरिया व कोलेटोट्रायकम बुरशीमुळे होतो. या रोगामुळे फळे, पाने आणि देठांवर काळे किंवा तपकिरी डाग पडतात आणि फळे कुजतात.
फळांवर लहान गोल डाग, कुजल्यामुळे वास बदलणे, पाने पिवळी पडून गळणे आणि देठांवर काळे डाग दिसणे ही मुख्य लक्षणे आहेत.
रोग प्रतिकारक वाण निवडावा, बागेत पाणी साचू देऊ नये, स्वच्छता राखावी आणि रोगग्रस्त फळे व फांद्या त्वरित नष्ट कराव्यात. योग्य प्रमाणात शेणखत व कंपोस्ट वापरावा.
१०-१५ दिवसांच्या अंतराने अझॉक्सीस्ट्रोबिन + डिफेनोकोनाझोल, कॉपर सल्फेट + मॅन्कोझेब, फ्लुओपायराम + टेब्युकोनाझोल यांसारख्या शिफारस केलेल्या बुरशीनाशकांची फवारणी करावी.
फुलधारणेच्या वेळी प्रतिबंधक फवारणी करावी, पावसाळ्यात फवारणी टाळावी, सामू ६.५-७ मध्ये समायोजित करावा, स्प्रेडर स्टीकर वापरावा आणि तांबेयुक्त बुरशीनाशक हंगामात २-३ वेळाच वापरावे.