Karpa in Banana: केळीच्या पानांवर पिवळे ठिपके? करपा रोग ओळखा आणि थांबवा!

Swarali Pawar

काय आहे करपा रोग?

इंग्रजीत या रोगाला सिगाटोका म्हणतात. हा रोग मायकोस्पेरिला म्युसिकोला या बुरशीमुळे होतो.

Karpa in Banana | Agrowon

सुरुवातीची लक्षणे

सुरुवातीला पानांच्या कडेवर पिवळे किंवा तपकिरी ठिपके दिसतात. ते वाढून पाने पिवळी पडून वाळू लागतात.

Symptoms in Banana | Agrowon

तीव्रता वाढल्याची लक्षणे

पाने फाटतात, देठापासून मोडून लोंबकळतात आणि झाडाची वाढ खुंटते. परिणामी फळे नीट भरत नाहीत आणि अकाली गळतात.

Symptoms of Sigatoka | Agrowon

रोगासाठी अनुकूल वातावरण

पाऊस, दवबिंदू आणि उष्ण व दमट हवामान रोगास पोषक ठरते. पावसाळ्यात वाढ अधिक दिसते.

Favourable Conditions | Agrowon

रोगाचा प्रसार

प्राथमिक प्रसार रोगग्रस्त कंद व जुन्या अवशेषांमुळे होतो. त्यासोबतच प्रसार हवेच्या माध्यमातूनही पसरतो.

Spread of Disease | Agrowon

रासायनिक नियंत्रण

मॅन्कोझेब, कॉपर ऑक्सीक्लोराईट किंवा क्लोरोथ्यलोनिलने सुरुवातीची फवारणी करावी. प्रादुर्भाव वाढल्यास कार्बेनडॅन्झिम, प्रोपीकोनिझोल + मिनरल ऑईल किंवा मेटीरम + पायऱ्याक्लोस्ट्रोबिन यांचा वापर करावा.

Spraying in Banana | Agrowon

तज्ज्ञांचा सल्ला

शेतकऱ्यांनी लक्षणे दिसण्यापूर्वीच फवारणी करावी. कंदप्रक्रिया व फेरपालट हे करपा रोग नियंत्रणाचे प्रभावी उपाय आहेत. असा सल्ला केळी संशोधन केंद्रातील तज्ज्ञांनी दिला.

Expert's Advice | Agrowon

Mung Urad Kewda Disease: मूग आणि उडीदवरील केवडा रोगाचे करा व्यवस्थापन

Yellow Mosaic Disease | Agrowon
अधिक माहितीसाठी..