Mahesh Gaikwad
बऱ्याचदा अचानक रक्तातील साखर वाढल्यामुळे थकवा, सारखी तहान लागणे, वारंवार लघवीला येणे किंवा डोकेदुखी या सारखी गंभीर लक्षणे जाणवतात.
जर रक्तातील साखरेची पातळी अचानक वाढली, तर तुम्ही घरीच काही उपाययोजना करू शकता.
रक्तातील साखरेची पातळी अचानक वाढल्यानंतर भरपूर प्रमाणात पाणी प्यावे. ज्यामुळे साखर नियंत्रणात राहते.
अचानक रक्तातील साखरेची पातळी झाल्यास लगेच गोड पदार्थ किंवा जड अन्न खाणे टाळावे.
रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यासाठी दालचिनीचा एक तुकडा चघळावा. यामुळे साखर नियंत्रणात राहण्यास मदत होते.
जेवणानंतर शरीरात साखरेची पातळी वाढते अशावेळी साखर नियंत्रणात ठेवण्यासाठी चालणे हा सर्वात उत्तम उपाय आहे.
जेव्हा रक्तातील साखरेची पातळी वाढल्यानंतर ग्रीन टी किंवा हर्बल टी प्यावा. यामुळे साखर नियंत्रणात राहते.
रक्तातील साखरेची पातळी अचानक वाढल्यानंतर जास्त ताणतणाव न घेता दिर्घ श्वास घ्यावा. पण जास्त प्रमाणात साखर वाढली असेल, तर तत्त्काळ डॉक्टारंचा सल्ला घ्यावा.