Cold Storage: शेतमाल वाचवायचा असेल तर शीतगृह गरजेचे! उभारणीतील महत्त्वाच्या गोष्टी

Swarali Pawar

शीतगृह का महत्त्वाचे?

काढणीनंतरही फळे आणि भाज्यांमध्ये पिकण्याच्या प्रक्रिया सुरूच राहतात. म्हणून योग्य साठवण नसेल तर शेतीमाल लवकर खराब होतो.

Agricultural cold storage | Agrowon

शीतगृह

शीतगृह म्हणजे तापमान आणि आर्द्रता नियंत्रित ठेवलेली बंद जागा. इथे फळे, भाजीपाला आणि इतर नाशवंत माल सुरक्षित ठेवला जातो.

Agricultural cold storage | Agrowon

फायदा?

कमी तापमानामुळे जंतूंची वाढ कमी होते. यामुळे शेतीमाल अधिक काळ ताजा आणि दर्जेदार राहतो.

Agricultural cold storage | Agrowon

सरकारी योजना

शीतगृह उभारण्यासाठी केंद्र सरकार आणि नाबार्डकडून अनुदान दिले जाते. प्रधानमंत्री किसान संपदा योजनेतही शीतसाखळी प्रकल्पांना मदत मिळते.

Agricultural cold storage | Agrowon

तापमानाचे नियोजन

प्रत्येक फळ आणि भाजीसाठी वेगवेगळे तापमान आवश्यक असते. साधारणपणे ३ ते ६ अंश सेल्सिअस तापमानात साठवण योग्य ठरते.

Agricultural cold storage | Agrowon

उष्णतारोधक बांधकाम

शीतगृहाच्या भिंती आणि छप्पर PUF पॅनेलने बनवलेले असतात. यामुळे बाहेरील उष्णता आत येत नाही आणि तापमान स्थिर राहते.

Agricultural cold storage | Agrowon

शीतकरण यंत्रणा

शीतगृहात अमोनिया किंवा फ्रेऑन रेफ्रिजरंट्सचा वापर केला जातो. कॉम्प्रेसर, कंडेन्सर आणि इव्हॅपोरेटर या यंत्रणेत महत्त्वाचे असतात.

Agricultural cold storage | Agrowon

मोठा फायदा

शीतगृहामुळे शेतीमालाची नासाडी मोठ्या प्रमाणात कमी होते. यामुळे शेतकऱ्यांना माल जास्त काळ विकता येतो त्यामुळे चांगला दर आणि अधिक नफा मिळू शकतो.

Agricultural cold storage | Agrowon

Goat Kid Care: नवजात करड्यांची काळजी कशी घ्यावी? मरतुक टाळण्यासाठी उपाय!

Agrowon
अधिक माहितीसाठी...