Weed Control : चिवट अमरवेल तणाच नियंत्रण कसं कराल?

Team Agrowon

अमरवेल या परोपजीवी तणाच्या प्रादुर्भावामुळे पिकाची वाढ खुंटत जाते. त्उयामुळे त्पादनात मोठी घट येते. तणाच्या नियंत्रणासाठी सामूहिकपणे एकात्मिक व्यवस्थापन पद्धतींचा अवलंब करण आवश्यक आहे.

Weed Control | Agrowon

शेताच्या बांधावरील, रस्त्याच्या कडेला तसेच शेणखतातील अमरवेल तण काढून गाडून किंवा जाळून नष्ट करावे. कारण झाडापासून वेगळा केलेला अमरवेल अनेक आठवडे जिवंत राहते.

Weed Control | Agrowon

जमिनीची खोल नांगरणी करावी. बियांच्या अंकुराची लांबी कमी असल्याने ८ सें.मी. पलीकडे अमरवेलीची उगवण होत नाही.

Weed Control | Agrowon

अमरवेल ८ ते १० दिवसांपेक्षा जास्त काळ यजमान झाडाशिवाय जिवंत राहू शकत नाही. त्यामुळे यजमान पिकांची लागवड तणनियंत्रण पद्धतींचा अवलंब केल्यानंतर ८ ते १० दिवसांनी करावी.

Weed Control | Agrowon

पिकांची फेरपालट करावी, प्रादुर्भावग्रस्त शेतामध्ये तृणवर्गीय पिकांची लागवड करावी.

Weed Control | Agrowon

जांभूळवाही देऊन उगवण अवस्थेतील तण नष्ट करावे. नियमित डवरणी व निंदणी करून पीक तणविरहित ठेवावे.

Weed Control | Agrowon

प्रादुर्भावग्रस्त शेतातील अवजारे स्वच्छ केल्यानंतरच त्यांचा पुन्हा वापर करावा.

Weed Control | Agrowon