Swarali Pawar
सर्व पोषणतत्त्वांनी युक्त संतुलित आहार जनावरांना द्यावा. वेळोवेळी तपासणी करून आवश्यक बदल करणे खुरांच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरते.
अपचन आणि खुरांच्या समस्या टाळण्यासाठी आहारात हळूहळू बदल करा. अचानक बदलामुळे खुरांच्या आरोग्यावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो.
जनावरांच्या पचनासाठी आणि खुरांच्या आरोग्यासाठी चांगल्या प्रतीचा तंतुमय चारा आवश्यक आहे. केवळ पशुखाद्यावर अवलंबून राहू नका.
पशुवैद्यकाच्या सल्ल्याने आहारात योग्य प्रमाणात खनिज, क्षार व जीवनसत्त्वांचे मिश्रण द्यावे. हे खुरांच्या मजबूत आरोग्यास मदत करते.
जनावरांना ताजे, स्वच्छ आणि पुरेशा प्रमाणात पाणी द्यावे. पाण्याचे संतुलन टिकवणे खुरांच्या आरोग्यासाठी महत्त्वाचे आहे.
बुरशीजन्य खाद्यामुळे खुरांच्या उतींना नुकसान होते. अशा आहाराचा वापर टाळल्यास खुरांच्या समस्या टाळता येतात.
जास्त दुधाळ गाईंसाठी पशुखाद्याचे प्रमाण हळूहळू वाढवा. दिवसातून ४–५ वेळा विभागून द्या आणि खायचा सोडा सोबत द्या.
चराऊ कुरणातील चारा वेळोवेळी तपासा. चाऱ्याचे पोषणतत्त्व प्रयोगशाळेत तपासून घ्या. जनावरांच्या आहारात क्षार व जीवनसत्त्वांचे योग्य प्रमाणात मिश्रण वापरा.