Swarali Pawar
मातीमध्ये असलेले लाखो सूक्ष्मजीव सुपीकतेसाठी महत्त्वाचे असतात. तणनाशकांमुळे हे सूक्ष्मजीव कमी होतात आणि मातीची सुपीकता घटते.
रसायनांमुळे माती घट्ट होते आणि भुसभुशीतपणा कमी होतो. त्यामुळे मुळांची वाढ कमी होते आणि पिकाचे उत्पादन घटते.
तणनाशकांचे दुष्परिणामामुळे माती पाणी आणि अन्नद्रव्य कमी धरते. त्यामुळे पिकांना योग्य पोषण मिळत नाही.
तणनाशकांचे रेसिड्यू बराच काळ मातीमध्ये राहतात. ही अवशेष पुढील पिकांना आणि मातीतील उपयुक्त जीवांना हानी करतात.
अवशेष पाण्या किंवा अन्नातून मानवी शरीरात जातात. त्यामुळे अॅलर्जी, फुफ्फुसाचे विकार आणि कॅन्सरसारखे गंभीर आजार होण्याचा धोका वाढतो.
तणनाशक पावसाबरोबर वाहून विहिरी, नदी-नाले दूषित करतात. त्यामुळे पिण्याचे आणि सिंचनाचे पाणी असुरक्षित होते.
एकच तणनाशक वारंवार वापरल्यास तणांमध्ये प्रतिकारशक्ती वाढते. त्यामुळे औषधाचा परिणाम कमी होतो आणि खर्च वाढतो.
फवारणीची योग्य मात्रा पाळा, तज्ज्ञांचा सल्ला घ्या, सकाळी फवारणी करा आणि हातमोजे–मास्क वापरा. जमिनीची सुधारणा करण्यासाठी सेंद्रिय खत वापरणे अत्यंत आवश्यक आहे.