Anuradha Vipat
रक्तातील साखरेचे प्रमाण वाढणे ही एक गंभीर समस्या आहे, ज्याकडे दुर्लक्ष केल्यास शरीराच्या इतर अवयवांवर वाईट परिणाम होऊ शकतो.
जर तुम्हाला मधुमेह असेल, तर खालील गोष्टींकडे अजिबात दुर्लक्ष करू नका.
गोड पदार्थ टाळा. साखर, मिठाई आणि कोल्ड ड्रिंक्स रक्तातील साखर झपाट्याने वाढवतात. पांढरा ब्रेड, बिस्किटे आणि मैद्याचे पदार्थ खाणे बंद करा.
केवळ औषधे घेऊन चालणार नाही, तर आठवड्यातून किमान एक-दोनदा 'ग्लुकोमीटर'ने साखर तपासा. दर तीन महिन्यांनी HbA1c चाचणी करा.
व्यायामाच्या अभावामुळे रक्तातील साखर नियंत्रित राहत नाही. दररोज किमान ३० मिनिटे वेगाने चाला.
योगासने आणि प्राणायाम तणाव कमी करण्यास आणि इन्सुलिनची संवेदनशीलता वाढवण्यास मदत करतात.
तणावामुळे शरीरात 'कॉर्टिसोल' हार्मोन वाढते, ज्यामुळे शुगर लेव्हल वाढते. ७-८ तासांची शांत झोप घेणे अनिवार्य आहे.