Swarali Pawar
लष्करी अळी ही बहुभक्षीय कीड असून ती ज्वारीसह अनेक पिके खाते. अळी अवस्था सर्वात जास्त नुकसान करते.
हिवाळा, जास्त आर्द्रता आणि कमी सूर्यप्रकाश अळीस पोषक ठरतो. या हवामानात शेतकऱ्यांनी विशेष लक्ष ठेवणे गरजेचे आहे.
पानांवर पांढरे पट्टे व छिद्रे दिसतात. पोंग्यात लाकडाच्या भुश्शासारखी विष्ठा आढळते.
उन्हाळ्यात खोल नांगरणी करून जमिनीतील अळी नष्ट करा. आंतरपीक पद्धत व तणमुक्त शेत ठेवा.
हेक्टरी २५ कामगंध सापळे आणि १ प्रकाश सापळा लावा. यामुळे पतंगांची संख्या कमी होते.
५% निंबोळी अर्क किंवा अझाडिरेक्टिनची फवारणी करा. जैविक कीडनाशके वापरल्यास अळी नियंत्रणात येते. पोंग्यात पडेल अशी फवारणी करावी.
रब्बी ज्वारीसाठी लेबलक्लेम रासायनिक औषधे उपलब्ध नाहीत. म्हणून अनावश्यक रसायनांचा वापर टाळावा.
वेळीच एकात्मिक कीड व्यवस्थापन केल्यास ज्वारी पीक सुरक्षित राहते. जैविक व सोप्या उपायांनी लष्करी अळीवर नियंत्रण मिळवा.