Swarali Pawar
मावा ही लहान, मऊ शरीराची कीड असून पानांच्या खालच्या बाजूला राहते. ती रस शोषून पिकाला कमकुवत करते.
माव्याची एक पिढी साधारण १४ दिवसांत पूर्ण होते. पंखरहित व पंखधारी असे दोन प्रकार आढळतात.
पाने पिवळी व वाकडी होतात आणि वाढ खुंटते. चिकट स्रावामुळे काळी बुरशी वाढते.
ढगाळ व दमट हवामान माव्यास पोषक ठरते. तण नियंत्रण व निरीक्षण नसल्यास प्रादुर्भाव वाढतो.
वेळेवर कोळपणी व खुरपणी केल्यास किडी कमी होतात. शेत स्वच्छ व तणविरहित ठेवणे महत्त्वाचे आहे.
मित्रकीटक जसे ढालकिडे व क्रायसोपा यांचे संवर्धन करा. ५% निंबोळी अर्काची फवारणी उपयुक्त ठरते.
प्रादुर्भाव जास्त असल्यास क्विनॉलफॉस २५% EC ची ३० मिली प्रति १० लिटर तर डायमिथोएट ३०% EC ची १२ मिली प्रती १० लिटर पाण्यात फवारणी करावी. पोंग्यात द्रावण जाईल अशी फवारणी करावी.
मित्रकीटकांना हानी पोहोचवणारी औषधे टाळा. एकात्मिक कीड व्यवस्थापनाने उत्पादन सुरक्षित ठेवा.