Swarali Pawar
कमी पाऊस आणि भूजलाच्या अतिवापरामुळे अनेक बोअरवेल कोरड्या पडतात. पुनर्भरणामुळे भूजल पातळी वाढून कूपनलिकेला जास्त काळ पाणी मिळू शकते.
पावसाचे स्वच्छ आणि गाळलेले पाणी शास्त्रीय पद्धतीने बोअरवेलमध्ये सोडणे म्हणजे पुनर्भरण. यामुळे जमिनीतील पाणीसाठा वाढण्यास मदत होते.
कूपनलिकेजवळ २ मीटर लांब, २ मीटर रुंद आणि १.५ मीटर खोल खड्डा घ्यावा. याच खड्ड्यात गाळण यंत्रणा तयार केली जाते.
केसिंग पाईपमध्ये ४ ते ५ मिमी व्यासाची छिद्रे पाडावीत. या छिद्रांवर २ मिमी जाळी गुंडाळून गाळ आत जाणे टाळावे.
खड्ड्यात खालून वर दगडगोटे, खडी, बारीक वाळू आणि विटांचे तुकडे भरावेत. या थरांमुळे पाणी स्वच्छ होऊन कूपनलिकेत जाते.
गाळयुक्त, रासायनिक किंवा औद्योगिक पाणी पुनर्भरणासाठी वापरू नये. क्षारपड जमिनीवरून वाहणारे पाणीही टाळावे.
गाळण यंत्रणेची वेळोवेळी स्वच्छता करणे आवश्यक आहे. यामुळे पुनर्भरणाची कार्यक्षमता टिकून राहते.
भूजल पातळी वाढून सिंचनासाठी पाणी जास्त काळ उपलब्ध राहते. ठिबक आणि तुषार सिंचनामुळे कमी पाण्यातही अधिक क्षेत्र सिंचनाखाली आणता येते.