Anuradha Vipat
सोन्याचे दागिने नियमित वापरल्याने किंवा हवेतील आर्द्रतेमुळे त्यांची चमक हळूहळू कमी होऊ लागते.
महागडे रासायनिक क्लिनर्स वापरण्याऐवजी तुम्ही घरातील साहित्याने सोन्याची चमक वर्षानुवर्षे नव्यासारखी ठेवू शकता.
सोन्यावरील साचलेली धूळ आणि तेलकटपणा काढण्याचा हा सर्वात सोपा आणि सुरक्षित मार्ग आहे.
जर दागिन्यांवर जास्त मळ किंवा काळेपणा साचला असेल, तर बेकिंग सोडा उत्तम काम करतो.
दागिने धुवून झाल्यावर ते कधीही उघडे सोडू नका. मायक्रोफायबर कापड किंवा मऊ सुती कपड्याने ते हलक्या हाताने टॅप करून सुकवा.
मेकअप करताना नेहमी आधी क्रीम, पावडर आणि स्प्रे लावून घ्या. ते सुकल्यानंतर सर्वात शेवटी सोन्याचे दागिने परिधान करा.
प्रत्येक सोन्याचा दागिना स्वतंत्रपणे मऊ मखमली कापडात किंवा टिश्यू पेपरमध्ये गुंडाळा. त्यानंतर ते एअर-टाईट प्लास्टिक झिप लॉक बॅगेत ठेवा.