Anuradha Vipat
तांब्या-पितळेची भांडी हवेतील ऑक्सिजन आणि आर्द्रतेमुळे काळी किंवा हिरवट पडतात.
रासायनिक क्लिनर वापरण्याऐवजी स्वयंपाकघरातील नैसर्गिक गोष्टी वापरून तुम्ही ही भांडी फक्त ५ मिनिटांत नव्यासारखी चमकवू शकता.
लिंबामधील ॲसिड आणि मिठाचे घर्षण भांड्यांवरील काळेपणा अवघ्या काही सेकंदांत काढून टाकते.
थोडी चिंच कोमट पाण्यात १० मिनिटे भिजवून त्याचा घट्ट कोळ तयार करा. ही पेस्ट काळ्या पडलेल्या भांड्यांवर सर्व बाजूने लावा आणि २ ते ३ मिनिटे ठेवा.
जर भांडी खूप जुनी आणि जास्त काळी असतील, तर विनेगर आणि मिठाच्या गरम पाण्यात ती २ मिनिटे बुडवून ठेवा. काळेपणा लगेच विरघळून जाईल.
टोमॅटोमध्ये असलेल्या नैसर्गिक ॲसिडमुळे चिवट काळे डाग निघून जातात. ५ मिनिटांनी नेहमीप्रमाणे घासणीने घासून भांडी धुवून घ्या.
भांडी पाण्याने धुतल्यानंतर ती तशीच सुकू देऊ नका, अन्यथा त्यावर पाण्याचे पांढरे डाग पडतात.