Swarali Pawar
पिकावर कोणती कीड आहे आणि ती झाडाच्या कोणत्या भागात आहे, हे आधी पाहा. किडीच्या प्रकारानुसार योग्य कीटकनाशक निवडल्यास फवारणी अधिक प्रभावी ठरते.
किडीच्या शरीरावर औषध थेट पडल्यावर परिणाम करणाऱ्या औषधांना स्पर्शजन्य म्हणतात. फुलकिडे, अळ्या आणि पाने कुरतडणाऱ्या किडींसाठी यांचा वापर केला जातो.
हे औषध झाडामध्ये शोषले जाऊन त्याच्या विविध भागांत पोहोचते. मावा, तुडतुडे आणि पांढरी माशीसारख्या रसशोषक किडींसाठी ते उपयुक्त ठरते.
धान्य साठवणुकीतील किडींच्या नियंत्रणासाठी फ्युमिगंट प्रकार वापरला जातो. अल्युमिनियम फॉस्फाईडसारख्या फ्युमिगंटचा वापर मात्र तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखालीच करावा.
जीवाणू, बुरशी किंवा वनस्पतीजन्य घटकांपासून तयार होणाऱ्या औषधांना जैविक कीटकनाशके म्हणतात.
कीटकांनी पिकाचा भाग खाल्ल्यानंतर शरीरात जाऊन परिणाम करणाऱ्या औषधांना स्टमक पॉइझन म्हणतात. पाने किंवा इतर भाग खाणाऱ्या अळ्यांच्या नियंत्रणात हा प्रकार उपयोगी ठरतो..
पीक, किडीचा प्रकार आणि कीड झाडावर कुठे आहे, याचा विचार करून औषध निवडा. पावसाळ्यात फवारणी केल्यास पावसामुळे औषधाचा परिणाम कमी होऊ शकतो, हेही लक्षात ठेवा.
एकच कीटकनाशक सतत वापरल्यास किडींमध्ये प्रतिकारशक्ती निर्माण होऊ शकते. शिफारशीनुसार वेगवेगळ्या कार्यपद्धतीची औषधे वापरा आणि योग्य वेळेत फवारणी करा.