Sugarcane Drip Irrigation: उसासाठी ठिबक सिंचन निवडताना कोणते निकष पाळावेत?

Swarali Pawar

योजना आणि संधी

‘प्रति थेंब जास्त पीक’ योजनेमुळे ठिबक सिंचनाला प्रोत्साहन मिळत आहे. अनुदानाचा लाभ घेऊन शेतकरी आधुनिक पद्धतीकडे वळू शकतात.

Scheme and Opportunity | Agrowon

जमिनीचा प्रकार महत्त्वाचा

जमिनीच्या प्रकारानुसार ठिबक नळ्यांचे अंतर आणि ड्रिपरची निवड बदलते. हलकी, मध्यम, काळी किंवा चढ-उताराची जमीन यानुसार रचना ठरते.

Land Type is imp | Agrowon

उथळ जमिनीसाठी शिफारस

उथळ जमिनीत पाणी लवकर झिरपते, त्यामुळे ड्रिपर जवळ ठेवावेत. १.३५ मीटर नळी अंतर व ०.३० मीटर ड्रिपर अंतर योग्य ठरते.

Soil Recommendation | Agrowon

मध्यम व काळी जमीन

मध्यम जमिनीत १.५० मीटर नळी अंतर आणि ०.४० मीटर ड्रिपर अंतर ठेवतात. खोल काळ्या जमिनीत १.८० मीटरपर्यंत नळीचे अंतर ठेवता येते.

Medium to Heavy Soil | Agrowon

चढउताराची जमीन

चढ-उताराच्या जमिनीत दाब नियंत्रित ड्रिपर वापरणे गरजेचे आहे. यामुळे वर-खाली दोन्ही बाजूंना समान पाणी मिळते.

Land Types | Agrowon

उपलब्ध पाण्याचा विचार

दररोज किती पाणी मिळते हे मोजणे आवश्यक आहे. पाणी कमी असल्यास १ ते १.६ लिटर/तास प्रवाह असलेली प्रणाली निवडावी.

Available water | Agrowon

पंपसेट व मोटार क्षमता

पंपची पॉवर आणि फ्लो योग्य नसल्यास सर्व झाडांना समान पाणी मिळत नाही. जास्त प्रवाह असलेले ड्रिपर निवडणे नेहमीच योग्य ठरत नाही.

Pumpset and Motor | Agrowon

ड्रिपरचे अंतर व प्रवाह

उसासाठी ४५ ते ६० सेमी ड्रिपर अंतर आणि २–४ LPH क्षमतेचे क्लॉग-फ्री ड्रिपर योग्य ठरतात. शास्त्रीय पद्धतीने निवड केल्यास पाण्याची बचत आणि उत्पादन वाढ दोन्ही साध्य होते.

Dripper Spacing | Agrowon

BeeKeeping Benefits: मधमाश्यांमुळे सोयाबीन उत्पादनात २०% वाढ; शेतकऱ्यांसाठी मोठी संधी

अधिक माहितीसाठी...