BeeKeeping Benefits: मधमाश्यांमुळे सोयाबीन उत्पादनात २०% वाढ; शेतकऱ्यांसाठी मोठी संधी

Swarali Pawar

सोयाबीन आणि प्रयोग

ब्राझीलमधील एका शेतकऱ्याने सोयाबीन शेतात मधमाशा सोडल्या. यामुळे उत्पादनात तब्बल २० टक्के वाढ झाली. मधमाश्यांमुळे सोयाबीनमध्ये उत्पादन लक्षणीय वाढले.

Beekeeping benefits | Agrowon

परागीभवन म्हणजे काय?

नर फुलांतील परागकण मादी फुलात जाण्याची प्रक्रिया म्हणजे परागीभवन. ही प्रक्रिया हवा, पाणी आणि कीटकांच्या मदतीने होते.

Beekeeping benefits | Agrowon

मधमाश्यांची भूमिका

मधमाशा फुलांवर फिरून परागकण पसरवतात. यामुळे परागसिंचन अधिक प्रभावी होते.

Beekeeping benefits | Agrowon

उत्पादनात वाढ कशी होते?

जास्त परागीभवन झाल्यास फुलांचे शेंगांमध्ये रूपांतर वाढते. शेंगांतील दाण्यांची संख्या आणि वजन वाढते.

Beekeeping benefits | Agrowon

१० ते ३०% वाढ शक्य

मधमाश्यांमुळे उत्पादनात १० ते ३० टक्क्यांपर्यंत वाढ मिळू शकते. हवामान बदल असला तरी उत्पादन स्थिर राहते.

Beekeeping benefits | Agrowon

गुणवत्तेत सुधारणा

योग्य परागसिंचनामुळे बिया मजबूत व भरघोस होतात. फळांचा दर्जा आणि बाजारभाव सुधारतो.

Beekeeping benefits | Agrowon

पूरक व्यवसाय

मधुमक्षिका पालनातून मध, मेण, पोलन आणि रॉयल जेली मिळते. कमी खर्चात दुहेरी उत्पन्न मिळवण्याचा हा चांगला मार्ग आहे.

Beekeeping benefits | Agrowon

पर्यावरणातील महत्त्व

मधमाश्या नसतील तर अन्ननिर्मितीवर परिणाम होऊ शकतो. म्हणून शेती आणि पर्यावरणासाठी त्यांचे संवर्धन आवश्यक आहे.

Beekeeping benefits | Agrowon

Rare Calf Delivery: एक-दोन नाही; जर्सी गायीने दिला चार वासरांना जन्म! धाराशिव जिल्ह्यातील दुर्मीळ घटना

Agrowon
अधिक माहितीसाठी...