Team Agrowon
पाणी पाझरण्याचे प्रमाण कमी, काळी चिकन मातीचे प्रमाण जास्त असलेली जमीन शेततळे उभारणीसाठी उपयुक्त असते.
साधारणपणे जमिनीच्या उतारावरील जागा शेततळ्यासाठी निवडावी.
मुरमाड, वालुकामय, सच्छिद्र खडक किंवा खारवट जमीन शेततळ्यास निवडू नये.
शेततळ्यातील पाण्याचा पाझर कमी करण्यासाठी शेततळ्यास अस्तरीकरण करणे गरजेचे असते.
खोलगट, शेताच्या खालच्या बाजूची जमीन शेततळ्यासाठी निवडावी.
पाण्याच्या प्रवाहाच्या मार्गावरील जागा निवडू नये. अशा जागेतील तळे गाळाने लवकर भरते. त्यामुळे शेततळे प्रवाहाच्या बाजूला थोड्या अंतरावर खोदावे.
सर्व पाणी निवडलेल्या जागेवर एकत्रित येईल असे नियोजन करावे.