Anuradha Vipat
तुमच्या आईसाठी 'मदर्स डे' खास बनवण्यासाठी तुम्ही काही साध्या पण मनाला भिडणाऱ्या गोष्टी करू शकता.
तिच्या उठण्यापूर्वी तिच्यासाठी चहा किंवा कॉफी आणि एखादं छोटं शुभेच्छा पत्र तयार ठेवा.
आजच्या दिवशी आईला स्वयंपाकघर आणि घरातील इतर कामांपासून पूर्ण विश्रांती द्या.
तिला जे पदार्थ मनापासून आवडतात, ते घरीच बनवण्याचा प्रयत्न करा.
दुपारच्या वेळी तिच्यासोबत तिच्या बालपणीचे किस्से, लग्नावेळच्या आठवणी किंवा तुमच्या जन्मावेळच्या गोष्टी तिच्याकडून ऐकून घ्या.
तुम्ही तिच्यासोबत एखादा तिचा आवडता चित्रपट किंवा नाटकही पाहू शकता.
एक सुंदर पत्र लिहा किंवा तिच्यासाठी एखादी कविता म्हणा. तिला सांगा की तिचे तुमच्या आयुष्यात काय महत्त्व आहे.