Anuradha Vipat
कोल्हापुरी चप्पल वर्षानुवर्षे मऊ, मजबूत आणि चमकदार ठेवण्यासाठी तिला पाण्यापासून दूर ठेवणे आणि वेळोवेळी तेलाने पॉलिश करणे सर्वात महत्त्वाचे आहे.
कोल्हापुरी चप्पल अस्सल चामड्यापासून बनवली जात असल्याने तिची विशेष काळजी घ्यावी लागते.
चप्पल कडक होऊ नये म्हणून तिच्यावर खोबरेल तेल किंवा एरंडेल तेल लावा. यामुळे चामडे मऊ राहते आणि चप्पल पायाला चावत नाही.
चामड्याच्या कोल्हापुरी चपलांना पाण्याचा स्पर्श होऊ देऊ नका. पाणी लागल्यास चामडे कडक होते आणि चप्पल लवकर तुटते.
चप्पल चुकून ओली झाल्यास ती कधीही थेट हेअर ड्रायरने किंवा कडक उन्हात सुकवू नका.
दमट हवेमुळे किंवा ओलसरपणामुळे चपलेवर पांढरी बुरशी जमा होते. बुरशी आल्यास मऊ सुती कापडाने ती कोरडीच घासून साफ करा.
चप्पल कधीही प्लास्टिकच्या पिशवीत बंद करून ठेवू नका. हवेअभावी चामड्याला बुरशी लागते.