Swarali Pawar
पाण्यात पालापाचोळा किंवा शेवाळे जास्त असतील तर वाळू गाळणी वापरा. आठवड्यातून एकदा बॅक-फ्लश करा आणि वाळूची पातळी व स्वच्छता तपासा.
पंपाच्या पुढे वॉटर मीटर आणि प्रेशर गेज बसवून दाब व प्रवाह तपासा. दर दोन दिवसांनी आवाज, तापमान, गळती आणि विद्युत जोडणी निरीक्षण करा
पाणी स्वच्छ असेल तर जाळी किंवा चकती गाळणी पुरेशी ठरते. दाबफरक 0.2 kg/cm² पेक्षा वाढला की गाळणी उघडून स्वच्छ करा आणि ड्रेन व्हॉल्व्हने घाण बाहेर काढा.
पीव्हीसी नळ्या साधारण 1 फूट जमिनीत गाडल्यास उन्हाचा व शेवाळाचा परिणाम कमी होतो. फ्लश व्हॉल्व्ह उघडून 10 मिनिटे पाणी सोडून नळ्या ठराविक कालावधीनंतर धुवा.
उपनळ्यांचे शेवटचे टोक उघडून आठवड्यातून एकदा स्वच्छ पाणी येईपर्यंत फ्लश करा. गळती दिसताच गुफ प्लगने बंद करा आणि तण काढताना नळ्यांचे संरक्षण करा.
ड्रिपर्समधून अपेक्षित दराने पाणी येते का हे वेळोवेळी तपासा. जिवाणू व शेवाळामुळे बंद होऊ नयेत म्हणून पाणी देण्याच्या शेवटच्या अर्ध्या तासात क्लोरीन प्रक्रिया करा.
मुख्य, उपमुख्य नळ्या व लॅटरल्स स्वच्छ धुवून गाळणी आणि खतटाकी नीट साफ करा. उपनळ्या काढून गोल गुंडाळून कोरड्या व सावलीत साठवा, आणि बंद करण्यापूर्वी आम्ल/क्लोरीन प्रक्रिया द्या.
योग्य देखभालीमुळे ठिबक संचाचा आयुष्यकाल वाढतो आणि सिंचन खर्चात लक्षणीय बचत होते. यामुळे पिकांचे आरोग्य सुधारते आणि एकूण उत्पादनात वाढ होते.