Anuradha Vipat
स्ट्रीट शॉपिंग करताना सर्वोत्तम वस्तू अगदी कमीत कमी किमतीत खरेदी करणे ही एक मोठी कला आहे.
जर तुम्ही फॅशन स्ट्रीट ठिकाणी जात असाल तर 'या' मजेदार आणि सोप्या बार्गेनिंग ट्रिक्स वापरून तुम्ही खूप पैसे वाचवू शकता.
जर दुकानदाराला समजले की तुम्हाला ती वस्तू हवीच आहे, तर तो किंमत कमी करणार नाही. वस्तू सामान्य असल्यासारखे दाखवा आणि शांतपणे किंमत विचारा.
जर त्याने ५०० रुपये सांगितले, तर तुम्ही अडीचशे किंवा ३०० रुपयांपासून सुरुवात करा.
जर दुकानदार तुमच्या किमतीला तयार नसेल, तर "ठीक आहे दादा, राहू दे, मी पुढे बघते" असे म्हणून पुढे जाण्यास सुरुवात करा.
एकाच वेळी जास्त विक्री होत असल्याने दुकानदार लगेच किंमत कमी करतो.
रात्री शेवटचे ग्राहक असल्यास ते हिशोब पूर्ण करण्यासाठी वस्तू स्वस्त विकून टाकतात.