Anuradha Vipat
पित्ताचा त्रास हा चुकीची जीवनशैली, अति-तिखट जेवण आणि मानसिक ताणामुळे उद्भवतो.
१ चमचा धने आणि १ चमचा जिरे रात्री १ ग्लास पाण्यात भिजवून ठेवा. सकाळी हे पाणी उकळवून गाळून घ्या आणि कोमट झाल्यावर रिकाम्या पोटी प्या.
रात्री ८ ते १० काळे मनुके पाण्यात भिजत घाला. सकाळी उठल्यावर हे मनुके चावून खा आणि ते पाणीही प्या.
आवळा हा पित्तावरील सर्वोत्तम नैसर्गिक शत्रू आहे. तुम्ही रोज सकाळी रिकाम्या पोटी १ चमचा आवळा पावडर कोमट पाण्यासोबत घेऊ शकता.
जर अचानक छातीत जास्त जळजळ होऊ लागली, तर अर्धा कप गार दुधात १ चमचा शुद्ध साजूक तूप टाकून प्या. यामुळे पोटातील ॲसिड लगेच शांत होते.
आठवड्यातून ३-४ वेळा नारळ पाणी प्या. हे शरीराची अंतर्गत पीएच पातळी संतुलित ठेवते.
प्रत्येक जेवणानंतर १ चमचा बडीशेप चावून खाण्याने पचनक्रिया सुधारते आणि गॅस किंवा पित्त तयार होत नाही.