Anuradha Vipat
दिवाळीच्या सणात समोर आलेला चविष्ट फराळ आणि आवडीची मिठाई पाहून स्वतःवर नियंत्रण ठेवणे कठीण होते, ज्यामुळे नकळतपणे ओव्हरईटिंग होते.
नकळतपणे होणाऱ्या ओव्हरईटिंग यामुळे अपचन, ॲसिडिटी आणि वजन वाढण्याचा त्रास होतो.
फराळ खाण्याच्या किंवा जेवण्याच्या २० ते ३० मिनिटे आधी एक ग्लास कोमट पाणी प्या. यामुळे तुमचे पोट थोडे भरेल आणि तुम्ही गरजेपेक्षा जास्त फराळ खाणार नाही.
मोठ्या ताटात फराळ घेतल्यास आपण जास्त प्रमाणात पदार्थ वाढून घेतो. त्याऐवजी लहान आकाराची प्लेट वापरा.
प्रत्येक घास किमान ३२ वेळा चवून खा. सावकाश खाल्ल्याने तुमचे पोट भरल्याचा संदेश मेंदूपर्यंत अचूक पोहोचतो आणि ओव्हरईटिंग आपोआप थांबते.
जर तुम्ही सकाळी फराळ केला असेल, तर दुपारच्या जेवणापर्यंत पोटाला विश्रांती द्या.
जर तुम्हाला एखादा लाडू किंवा करंजी खाण्याची तीव्र इच्छा असेल, तर तो पूर्ण एकटा न खाता घरातील कोणासोबत तरी अर्धा शेअर करा.