Faral Storage Tips : फराळ महिनाभर राहील पहिल्या दिवसासारखाच कुरकुरीत; डब्यात भरताना फॉलो करा 'या' पद्धती!

Anuradha Vipat

खवट वास

दिवाळीचा फराळ कितीही मनापासून आणि परफेक्ट बनवला, तरी जर तो नीट साठवून ठेवला नाही तर काहीच दिवसांत मऊ पडतो किंवा त्याला खवट वास येऊ लागतो.

Faral Storage Tips | agrowon

सोप्या पद्धतींचा वापर

फराळ महिनाभर अगदी पहिल्या दिवसासारखाच खमंग आणि कुरकुरीत राहण्यासाठी साठवणूक करताना खालील सोप्या पद्धतींचा वापर करा.

Faral Storage Tips | agrowon

फराळ पूर्णपणे थंड करणे

फराळ तळल्यानंतर किंवा बनवल्यानंतर तो एका मोठ्या परातीत किंवा पेपरवर पसरवून ठेवा. तो खोलीच्या तापमानावर पूर्णपणे थंड होऊ द्या.

Faral Storage Tips | agrowon

बटर पेपर किंवा टिपू पेपरचा वापर

फराळ साठवताना डब्याच्या तळाशी आणि कडेला स्वच्छ बटर पेपर किंवा पांढरा टिश्यू पेपर अंथरा. डब्यात फराळ भरल्यानंतर वरूनही एक पेपर ठेवून मग डब्याचे झाकण लावा.

Faral Storage Tips | agrowon

हवाबंध आणि योग्य डब्यांची निवड

फराळ साठवण्यासाठी नेहमी दर्जेदार प्लास्टिकचे एअर-टाईट डबे किंवा स्टीलचे घट्ट झाकणाचे डबे वापरा.

Faral Storage Tips | agrowon

वेगवेगळ्या पदार्थांसाठी वेगळे डबे

तिखट-मिठाचे पदार्थ (चकली, शेव, चिवडा) आणि गोड पदार्थ (शंकरपाळी, करंजी, लाडू) एकाच डब्यात एकत्र भरून ठेवू नका.

Faral Storage Tips | agrowon

डबा सारखा उघडणे टाळा

संपूर्ण महिन्याचा फराळ एका मोठ्या मुख्य डब्यात भरून ठेवा. त्यातून आठवडाभर पुरेल एवढाच फराळ एका छोट्या डब्यात काढून घ्या. रोज खाण्यासाठी छोटा डबा वापरा.

Faral Storage Tips | agrowon

Diwali Cooking Hacks : स्मार्ट किचन टिप्स: दिवाळी फराळ तळताना तेल स्वच्छ आणि फ्रेश ठेवण्याचे सोपे घरगुती उपाय

Diwali Cooking Hacks | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...